Breaking News

ऊस तोडीला पैसे मागणाऱ्या चालू टोळ्या

Gangs demanding money for cutting sugarcane

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० - फलटण तालुक्यात चार साखर कारखाने असून शेतकऱ्यांच्या उसाला 'तोड' मात्र 'चालू' टोळ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय, लाच घेतल्याशिवाय ऊसतोड केली जात नाही, उस उत्पादक शेतकरी यामध्ये भरडला जात आहे, अडाणी शेतकऱ्यांपासून सुशिक्षित शेतकरी सुद्धा यामध्ये अडकला आहे, पैसे घेतल्याशिवाय टोळ्या शेतात शिरत नाहीत, चिटबॉय पासून सुपरवायझर पर्यंत तक्रार केल्या तरी, काही फायदा होत नाही, उलटपक्षी ते म्हणतात, लवकर ऊसतोड हवी असेल तर टोळ्या काय म्हणतात ,त्याप्रमाणे तुम्हाला वागावेच लागेल, दहा हजार, आठ हजार, सहा हजार असा ऊसतोड करून घेण्याचा टोळ्यांचा रेट आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही शिक्षक सुद्धा आहेत, काही बँक अधिकाऱ्यांनी तर सात वर्ष सतत ऊस नोंद करून सुद्धा त्यांनी पैसे दिले नसल्यामुळे त्यांच्या ऊसाला आजही तोड नाही, आता फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक तीव्र आंदोलन करण्याची तयारीत आहेत.

No comments