मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी
सातारा दि.13 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
ई-केवायसी अत्यंत सोपी असून स्वतः महिला आपल्या मोबाईलवरुन देखील करु शकते. ई-केवायसी करताना प्रथम महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणीकरण करावे तदनंतर पती, वडील यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी सदर कालावधीत ई-केवायसी केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.
योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांची पती, वडील दोन्हीही मयत आहेत किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मयत आहेत तसेच विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या महिला यांचे ई-केवायसीबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेणेबाबत विचार विनिमय सुरु आहे. परंतु तत्पूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेचे आधार कार्ड प्रमाणीत करुन अपूर्ण ई-केवायसी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेणेबाबत शासनामार्फत स्वतंत्र सूचना निर्गमित करणेत येणार आहे. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले.

No comments