तब्बल दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
सातारा (प्रतिनिधी ) - तब्बल दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23/9/2024 ते 12 जून 2025 दरम्यान रवींद्र पुरुषोत्तमदास शहा आणि मोहन पुरुषोत्तमदास शहा दोन्ही रा. मंगळवार पेठ, सातारा यांनी संगनमत करून 23/9/2024 च्या सभा नोटीस वर तसेच 30/9/2024 च्या प्रोसिडिंगवर ट्रस्टमधील इतर विश्वस्तांच्या खोट्या व बनावट सह्या करून बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरून श्री काळाराम मंदिर व हटकेश्वर देवस्थान ट्रस्ट, मंगळवार पेठ, सातारा मधील देवस्थानची दरे खुर्द, ता. सातारा येथील दीड कोटी किंमतीची अंदाजे चाळीस एकर जमीन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्तांची फसवणूक करून, विक्री करून आलेल्या रकमेचा अपहार केला आहे. याबाबतची फिर्याद धवलचंद्र बाळकृष्ण दोशी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक म्हेत्रे करीत आहेत.
No comments