तरडगाव येथे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते कृषिदेव पेट्रोलियम व गोदाम बांधकामाचा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ जून २०२५ - तरडगाव, ता. फलटण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषिदेव पेट्रोलियम तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 1000 मेट्रिक टन क्षमता असलेल्या गोदाम बांधकामाचा शुभारंभ रविवार दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, तसेच पणन मंडळाचे उप व्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, असिस्टंट सेल्स मॅनेजर शिखर श्रीवास्तव, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
तसेच यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड, रेश्मा भोसले, धैर्यशील अनपट, भीमदेव बुरुंगले, नितीन भोसले, महादेव बोंद्रे, रेखा खरात, दिलीपराव अडसूळ, द्रोपदा नरुटे, रमेशकाका बोंद्रे, सुभाषराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर व संचालक मंडळाने केले आहे.
No comments