Breaking News

चायना मांजामुळे फलटण मध्ये कबूतराचा मृत्यू

Pigeon dies in Phaltan due to Chinese mange

    फलटण (प्रतिनिधी) – तहसील कार्यालय फलटण येथे सोमवारी एक हृदयद्रावक प्रकार घडला. चायना मांजामध्ये अडकून एका कबूतराला आपला जीव गमवावा लागला. पंचमीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्याचा हंगाम जोरात सुरु असताना, या पतंगांसाठी वापरण्यात येणाऱ्या धोकादायक चायना मांज्यामुळे पक्षांचे आणि नागरिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
    प्रत्येक वर्षी या चायना मांज्यामुळे अनेक निरपराध पक्षी आणि नागरिक जखमी होत असतात. मांजा अत्यंत धारदार असून, तो झाडांमध्ये, विद्युत वाहिन्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी अडकून राहतो. त्यात अडकलेले पक्षी हालअपेष्टा सहन करत मृत्यूमुखी पडतात. यामुळे पर्यावरणाचा समतोलही बिघडण्याचा धोका आहे.
    प्रशासनाने अनेकदा चायना मांजावर बंदी घातली असली तरी त्याची सर्रास विक्री आणि वापर अद्याप सुरू आहे. नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी घेत ही वापरणं टाळणं अत्यंत आवश्यक आहे. सण साजरे करताना इतर जीवांची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे हीच खरी संस्कृती आहे.

No comments