११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २१ मे २०२५ - श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे इयत्ता -११वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी मोफत नाव नोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश होणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा घनवट पी. डी. यांनी माहिती दिली.
या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व शास्त्र शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक- १९ मे ते- २८ मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. फलटण तालुक्यासह शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण हे सदैव कटिबद्ध असून
या कनिष्ठ महाविद्यालयाने गुणात्मक, संख्यात्मक दर्जा राखत उज्वल यशाची दीर्घ परंपरा टिकवून ठेवली आहे.
सदर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, शास्त्र, द्विलक्षी अभ्यासक्रम व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, शास्त्रसह द्विलक्षी विभागात मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, ॲनिमल सायन्स, क्रॉप सायन्स या विषयांची निवड करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, भव्य क्रीडांगण, विविध स्पर्धा परीक्षा विषयी सखोल मार्गदर्शन, विविध प्रकारच्या सरकारी आर्थिक सवलती व शिष्यवृत्ती, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व वर्कशॉप, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, विविध विषयांवरील चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन सुसज्ज व्यायाम शाळा, आर ओ ची शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, उपहारगृहाची सुविधा, अहिल्याबाई होळकर पास योजना, मोफत इयत्ता -११ ऑनलाईन प्रवेश रजिस्ट्रेशन केंद्र व क्यू आर कोडसह समुपदेशन केंद्र इ.अत्याधुनिक सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
या सुविधांचा विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- कला विभाग- प्रा.श्री गायकवाड एस. व्ही. मो- ९८८१४६५५७६
वाणिज्य विभाग - प्रा.श्री तांबोळी ए एस मो-८६६८५६५०९३
विज्ञान विभाग - प्रा.श्री साळुंखे पी व्ही मो-७५८८१६४१८९
प्राचार्य- श्री घनवट पी.डी. मो- ९६५७२१३०३७. यांच्याशी संपर्क करण्यात यावे असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे.
No comments