Breaking News

खा. रणजितसिंह यांचा फलटण येथे प्रचार शुभारंभ

kha. Ranjit Singh's campaign starts at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - माढा लोकसभा मतदार संघांचे महायुती व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्री सद्‌गुरु हरिबुवा मंदिर, मलठण,फलटण येथे प्रचारचा शुभारंभ आज मंगळवार दि. २३/४/२०२४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणवीरराजे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

    प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर मलठण परिसरात पदयात्रा निघणार आहे. तरी फलटण शहरातील सर्व कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित राहावे, आवाहन, भारतीय जनता पार्टी, फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.

No comments