Breaking News

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

The government is positive about the demands of Asha Sevaks – Deputy Chief Minister Ajit Pawar

    मुंबई, दि. 26 : मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

    विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

No comments