Breaking News

राजुरी येथे मारामारी ; जीवे मारण्याचा प्रयत्न ; १२ जणांवर गुन्हा दाखल

Fights at Rajuri ; Attempt to kill; A case has been registered against 12 persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - राजुरी ता. फलटण गावच्या यात्रेत कुस्ती लावण्याच्या कारणावरून, बेकायदा जमाव जमवून,  शस्त्राच्या साह्याने एकमेकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून, गंभीर दुखापत केल्याप्रकरणी राजुरी येथील गावडे व सांगळे कुटुंबियांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एकूण १२ जणांच्या विरोधात आयपीसी व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार,  विनोद किसन सांगळे रा. राजुरी ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २६ रोजी राजुरी गावच्या यात्रेत कुस्ती कारणावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाची मुळे 1) ज्ञानदेव आनंदा गावडे 2) पंकज ज्ञानदेव गावडे 3) मधुकर आनंदा गावडे 4) बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे 5) ओंकार संपत सांगळे सर्व राहणार राजुरी ता.फलटण यांनी कुस्ती संपल्यानंतर फिर्यादी हे त्यांचे चार चाकी वाहनातून जात असताना, कुरवली पाटी येथील सावतामाळी हॉटेलच्या समोर सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास गाडीतून खाली उतरत असताना, तेथे उभे असलेले उपरोक्त संशयित आरोपी यांनी, पोत्यातील तलवार काढून फिर्यादीचे कपाळावर डोक्याचे डावे बाजूस व डोक्याचे पाठीमागील बाजूस उजव्या हाताचे पंजावर वार करून गंभीर जखमी केले व जीव मरणेचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत.

    तर ज्ञानदेव आनंद गावडे रा. राजुरी ता.फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २६/२/२०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राजुरी ता. फलटण गावचे  हद्दीत विनोद किसन सांगळे यांनी फिर्यादी यांच्या पुतण्याची नेमण्यात आलेली कुस्ती थांबवलेच्या कारणावरून, चिडून जाऊन, 1)  विनोद किसन सांगळे 2)  दर्पण बाळासो सांगळे 3)  यशराज विनोद सांगळे 4) धीरज शरद सांगळे 5) रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे 6) बाळासो येंकू  शेंडगे 7) सोनबा येंकू  शेंडगे सर्व रा. राजुरी ता.फलटण. जि.सातारा. यांनी,  फिर्यादी व मुलगा पंकजाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, संगममताने जीव घेणा हल्ला केला असल्याची फिर्याद दिली आहे, त्यानुसार उपरोक्त सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट हे करीत आहेत.

No comments