कत्तलीसाठी चालवलेल्या ८ गोवंशांची पोलिसांनी केली सुटका
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - शेरे शिदेंवाडी येथे नुकतीच जन्मलेली गोवंशीय कालवडे त्यांच्या चारापाण्याची सोय न करता तोंड व पाय बांधून, त्यांना क्रूरतेची वागणुक देवून, कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सापडल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३/१/२०२४ रोजी सायं. ४.४० वाजण्याच्या सुमारास मौजे शेरे शिदेंवाडी ता. फलटण गावचे हद्दीत सागर बाळासो यादव यांच्या राहते घराचे मागे ईसम नामे १. सलमान अलताफ कुरेशी वय २६ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. कुरेशी नगर फलटण, ता. फलटण व २. अलताफ कुरेशी व ३. एक इसम हे त्यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर क्र एम एच ११ बी एच ७५१७ या वाहनामध्ये ८ जर्शी जातीची नुकतीच जन्मलेली कालवडे क्रूरतेची वागणुक देवून, त्यांचे चारही पाय व तोंड बांधुन, त्यांची चारा पाण्याची सोय न करता, त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडुन वैद्यकीय तपासणी करुन न घेता कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला व स्विफ्ट गाडी जप्त करून, ८ गोवंशीय काळवडांची सुटका केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अभंग हे करीत आहेत.

No comments