श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण मॅरेथॉन चे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ - महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती , फलटण यांच्या तर्फे, मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक, फलटण येथे 'फलटण मॅरेथॉन २०२३' चे आयोजन, मंगळवार दि. ०२ मे २०२३ रोजी करण्यात आले आहे.
साउंड माईंड इन या साउंड बॉडी (Sound mind in a sound body) या उक्ती नुसार मानवी जीवन आनंदी व समाधानी असण्यासाठी निरोगी मनाची आणि शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असतो. देशाच्या जडणघडणीत युवकांचे असणारे योगदान लक्षात घेऊन, शालेय विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण युवा पिढीला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले असून, या स्पर्धा मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक , फलटण येथे सकाळी ६.०० वाजता सुरू करण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी - २० रुपये असणार आहे .
मॅरेथॉन स्पर्धेत वयोगट व अंतर खालीलप्रमाणे असणार आहे.
मुले - १८ वर्षे आतील - ५ कि. मी.
मुली - १८ वर्षे आतील- 3 कि. मी.
पुरुष - खुला गट -१० कि.मी.
महिला - खुला गट - ८ कि.मी.
पुरुष - ४५ वर्षापुढील - ३ कि. मी.
महिला - ४५ वर्षापुढील - २ कि.मी.
नाव नोंदणी अंतिम तारीख २८/४/२०२३ असणार आहे . आणि नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करुन आपले चेस नंबर दि. २९ व ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वा. ते दु.१ वा. या वेळेत मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज , फलटण येथून घेऊन जावेत.
खुला गट ( पुरुष व महिला ) यांना खालीलप्रमाणे पारितोषिक रक्कम व ट्रॉफी असणार आहे .
प्रथम क्रमांक - 5001/- व ट्रॉफी
द्वितीय क्रमांक -3001/- व ट्रॉफी
तृतीय क्रमांक -2001 /- व ट्रॉफी
१८ वर्षे गट (मुले - मुली) व ४५ वर्षापुढील पुरुष व महिला यांना खालीलप्रमाणे पारितोषिक रक्कम व ट्रॉफी असणार आहे .
प्रथम क्रमांक - 3001/- व ट्रॉफी
द्वितीय क्रमांक -2001/- व ट्रॉफी
तृतीय क्रमांक -1001 /- व ट्रॉफी
अधिक माहितीसाठी संपर्क -
1) श्री. नामदेव मोरे 9960082120
2) श्री.जनार्दन पवार 9284765995
3) श्री.सचिन धुमाळ 9890382204
4) श्री . राज जाधव 9226139653
5) डॉ. स्वप्नील पाटील770901629
6) श्री .तुषार मोहिते 9423888344
7) श्री.तायाप्पा शेंडगे 9322848199
8) श्री.उत्तम घोरपडे 9421121031
9) श्री . सुरज ढेंबरे 8805777998
10) श्री.सुहास कदम 7083720520
रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक-
https://forms.gle/of4GtENq3gjHL1F78
No comments