झिरपवाडी येथे रमाई आवास योजनेत लाभार्थीकडून फसवणूक ; कारवाई करण्याची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ - ग्रामपंचायत झिरपवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी चुकीचा सातबारा जोडून प्रत्यक्षात रमाई आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घराचे बांधकाम दुसऱ्याच्या जागेत करून शासनाची फसवणूक केली आहे तसेच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जागेत अतिक्रमण करून संबंधित शेतकऱ्यावर देखील अन्याय केला आहे, तरी या प्रकाराबाबत चौकशी करून संबंधित लाभार्थी तसेच झिरपवाडी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सायली अनिल साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे केली आहे.
सायली अनिल साबळे रा. बारामती यांचे मौजे ग्रामपंचायत झीरपवाडी हद्दीत गट क्रमांक 108/3 अ मध्ये 0.22 आर क्षेत्र आहे. त्यांच्या गटा शेजारी विजय पोपट सोनवणे व इतर पाच यांचा गट क्रमांक 108/1 आहे. विजय पोपट सोनवणे याने ग्रामपंचायत झिरपवडी यांना रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेतलेला आहे. विजय सोनवणे यांनी ग्रामपंचायतला दाखल केलेल्या सातबारा उतारा हा 108/1 आहे. मात्र बांधकाम हे गट क्रमांक 108/3 अ मध्ये केलेले आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने सदर बांधकाम करण्यापूर्वी स्थळ पहाणी व तपासणी करणे आवश्यक होते. तसेच सदर क्षेत्रामध्ये केलेले बांधकाम अधिगृहीत केलेली व बाधित क्षेत्र घोषित केलेल्या 18 मीटर रुंदीच्या जागेत गट क्र 108/3 अ मध्ये अतिक्रमण करून बांधन्यात आलेली आहे.
सायली साबळे यांनी दिनांक 13/3/23 रोजी ग्रामपंचायत झिरपवाडी यांना बेकायदेशीर बांधकामा बाबत तक्रारी अर्ज दाखल केलेला होता, त्याबाबत ग्रामपंचायत झिरपवाडी यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही, विजय पोपट सोनवणे याने शासनाची फसवणूक केलेली असून 'बेकायदेशीर बांधकामास सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांचा पाठिंबा दिसत असून या कामी पैशाची देवाण-घेवाण झाली असल्याचा माझा दाट संशय आहे. वास्तविक सदर बेकायदेशीर कामासाठी उचित कारवाई होणे अपेक्षित असताना, विजय पोपट सोनवणे याचे बेकायदेशीर कामास पाठिंबा असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये काही काळेबेरे असण्याची शक्यता अधिक वाटते, सदर बेकायदेशीर बांधकाम व शासनाची फसवणूक करून फौजदारी स्वरूपात गुन्हा केला आहे, सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत सायली अनिल साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना निवेदन दिले आहे.

No comments