फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत १४ जागांसाठी २४ उमेदवार रींगणात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी एकुण ८१ जणांनी माघार घेतली. एकुण चार जागा बिनविरोध झाल्याने आता १४ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रींगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण सुनिल धायगुडे यांनी दिली आहे.
बाजार समितीच्या निवडणूकीसाठी राजेगटांतर्गतच इच्छुकांची मांदियाळी असल्याने माघार घेणार कोण याबाबत उत्सुक्ता होती. बाजार समितीतील एकुण १८ जागांसाठी १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज छाननीत १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते, तसेच यावेळी ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती व हमाल मापाडी या प्रवर्गात एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने एकुण दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकुण ८१ जणांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. यावेळी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील एक व कृषि पत व बहुद्देशीय सहकारी संस्था ( विकास सोसायटी मतदार संघ ) इतर मागास प्रवर्गातील एक अशा दोन जागा बिनविरोध झाल्याने एकुण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. मतदार संघाचे नाव, प्रवर्गातील एकुण जागा व उमेदवार संख्या व नावे पुढिल प्रमाणे
कृषि पत व बहुद्देशीय सहकारी संस्था ( विकास सोसायटी मतदार संघ ) सर्वसाधारण प्रवर्ग एकुण जागा ७ उमेदवार संख्या ११,
उमेदवार पुढील प्रमाणे – नाईक निंबाळकर रघुनाथराजे विक्रमसिंह, होळकर भगवान दादासो, शिंदे चेतन सुभाष, सस्ते निशिगंध आत्माराम, पाटील शंभुराज विनायक, सरक खंडेराव पांडुरंग, लोखंडे शरद लक्ष्मण, गावडे ज्ञानदेव बाबासो, गौंड दिपक विठोबा, माने विक्रम रामचंद्र, लेाखंडे शंकर आत्माराम
महिला प्रतिनिधी जागा दोन उमेदवार संख्या तीन, उमेदवारांची नावे रणवरे सुनिता चंद्रकांत, सस्ते जयश्री गणपत, कुलाळ शितल महादेव
भटके विमुक्त जाती जागा एक उमेदवार दोन, नावे खताळ भिमराव पोपटराव, इवरे नानासो पोपट.
ग्रामपंचायत मतदार संघ - सर्वसाधारण प्रवर्ग जागा दोन, उमेदवार पाच, नावे झणझणे प्रदिप हरिभाऊ, शेवते काशिनाथ साधु, शिंदे किरण सयाजी, शिंदे रविंद्र आमराव, खरात चांगदेव कृष्णा.
व्यापारी व अडते मतदार संघ - जागा दोन उमेदवार तिन, नावे ननावरे बाळासाहेब दयाराम, कदम संजय हरिभाऊ, जाधव समर दिलीप.
बिनविरोध निवडून गेलेले संचालक पुढील प्रमाणे –
अक्षय गायकवाड ( ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ), निलेश कापसे ( हमाल मापाडी मतदारसंघ ), तुळशीदास शिंदे ( सोसायटी इतर मागास मतदारसंघ) संतोष जगताप ( ग्रामपंचायत आर्थिक मागास मतदारसंघ )
या निवडणूकीत रासप, दोन्ही शिवसेना गट व राष्ट्रीय काँग्रेसचे यांचेही उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत.
सदर निवडणूकीसाठी दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

No comments