डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव शांततेत व शिस्तबद्ध संपन्न केल्याबद्दल प्रशासनाकडून जयंती समितीचा सत्कार
![]() |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा सत्कार करताना उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप |
The administration felicitated the Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Mahotsav Committee
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 19 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव फलटण शहरात शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पाडल्याबद्दल प्रशासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत सत्कार केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरामध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. तसेच शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती, जयंती महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार न घडता, कायदा सुव्यवस्थेचे पालन करून, शांततेत व शिस्तबद्धरित्या मिरवणूक काढल्याबद्दल फलटण उपविभागीय अधिकारी व शहर पोलीस प्रशासनाने जयंती महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार, फलटण तालुका उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप व उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव बरडे तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील यांनी केला. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व जयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
विशेष करून पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटीचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने जयंती साजरी केल्याचे अनुषंगाने हा सत्कार करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील यांनी सांगितले.

No comments