फलटण तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रोटर्फ क्रीडांगण उभारणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
प्रथम क्रमांक विजेत्या कोल्हापूर संघासमवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : गेल्या सुमारे ३०/४० वर्षांपासून फलटण करांनी जपलेली हॉकीची परंपरा अधिक समृध्द करुन येथून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तयार होण्यासाठी तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रोटर्फ (Astroturf) क्रीडांगण उभारण्याची ग्वाही देत स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
येथील आ. श्रीमंत विजयसिंहराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलात (घडसोली मैदान) आयोजित श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धा २०२२ च्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरुन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्लिअरन्स लोबो विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
फलटण सारख्या छोट्या शहरात उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन केल्याचे नमूद करीत येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगताना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रोटर्फ (astoturf) मैदान तयार झाल्यास आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू नक्कीच तयार होतील व त्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे स्पष्ट आश्वासन भारतीय हॉकी प्रशिक्षक क्लरेन्स लोबो यांनी दिले.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक कोल्हापूर पोलीस कोल्हापूर यांनी पटकावला त्यांना २१ हजार रुपये रोख व श्रीमंत मालोजीराजे चषक, द्वितीय क्रमांक मुंबई कस्टम मुंबई यांना १५ हजार रुपये रोख व श्रीमंत मालोजीराजे चषक, तृतीय क्रमांक महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर यांना ११ हजार रुपये रोख व श्रीमंत मालोजीराजे चषक, चतुर्थ क्रमांक फलटण हॉकी असोसिएशन फलटण यांना सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले. टूर्नामेंट ऑफ द फेअरला रोख रुपये रक्कम १०००/-देण्यात आले.
या स्पर्धेतून बेस्ट फॉरवर्ड तन्मय जाधव (महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर), बेस्ट डिफेन्स पंकज सिंग (मुंबई कस्टम मुंबई), बेस्ट हाफ भावेश रायते (फलटण हॉकी असोसिएशन), बेस्ट गोलकीपर अथर्व पवार (फलटण हॉकी असोसिएशन) आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भीम बाटला (मुंबई कस्टम मुंबई) यांना बेस्ट प्लेयरची ट्रॉफी सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभास फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक जगन्नाथ धुमाळ सर, सातारा जिल्हा खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनभैय्या भोसले व तुषार निंबाळकर, राहुल निंबाळकर, भाऊ कापसे, क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेद तांबोळी, खानविलकर, मुधोजी महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, डॉ. सुनील बर्वे, डॉ. दीपक शेंडे, बाळासाहेब मेटकरी, खो - खो राष्ट्रीय खेळाडू कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, संचालक महादेव माने, अशोकराव सोनवणे यांच्या सह शहरवासीय हॉकी प्रेमी नागरिक उपस्थित होते.
श्रीमंत मालोजीराजे चषक निमंत्रित हॉकी स्पर्धा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या, त्यामध्ये निमंत्रित ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र जाधव, महेश खुटाळे, सुजित निंबाळकर, प्रवीण गाडे, सचिन लाळगे, सुहास ढेकळे, सुमित मोहिते, अभिजीत कदम, प्रा. बी. बी. खुरंगे, गणेश पवार, संदीप ढेंबरे, विपुल गांधी, प्रा. तायाप्पा शेडगे, अय्याज शेख, मोहसीन बागवान, दत्तू जाधव, भैय्या असलेकर, मौसम दोशी, मंगेश शिंदे, या आजी - माजी खेळाडूंचे तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी. एम. गंगावणे, सगुणमाता कन्स्ट्रक्शनचे दिलीप शिंदे, फलटण नगरपरिषद यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन क्रीडा समिती सचिव सचिन धुमाळ सर यांनी तर समारोप व आभार राष्ट्रीय हॉकी खेळाडू सचिन लाळगे यांनी मानले.
No comments