Breaking News

घरासमोर लावलेल्या स्विफ्ट डिझायरची चोरी

The theft of Swift Desire in front of the house

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. २४ : फलटण तालुक्यातील खुंटे ता. फलटण येथून घरासमोर लावलेली पाच लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार चोरुन नेल्याप्रकरणी सागर गायकवाड वय ३६ रा. आसू ता. फलटण याच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

       या प्रकरणी रणजीत संदीप धुमाळ वय २३ रा. खुंटे ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खुंटे येथील धुमाळ यांच्या घरासमोर लावलेली एमएच ११ डीए १६७८ ही पाच लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार सागर गायकवाड याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरुन नेली. यावरुन सागर गायकवाड याच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढिल तपास पोलिस हवालदार मोहन हांगे करीत आहेत.

No comments