धुळदेव, फलटण येथे भरदिवसा चोरी; ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - धुळदेव फलटण ता. फलटण येथे भरदिवसा घराचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडुन, अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून, घरातील सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र व रोख रक्कम असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
या गुन्ह्याची अधिक माहिती अशी की, दि. ४ जून २०२२ रोजी, सौ. दीपाली गणपत शेडगे या, सकाळी १०:३० वाजता, धुळदेव ता. फलटण येथील राहत्या घराला कुलूप लावून, कामानिमित्ताने फलटण शहरात आल्या होत्या. घरातील इतर व्यक्तीही कामानिमित्ताने बाहेरच होत्या. ही संधी साधून, अज्ञात चोरट्याने घराचे सेप्टी डोअरचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील लोखंडी कपाटातून ३० हजार रुपये किंमतीच्या ५ ग्रॅम व २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व ५ ग्रॅम वजनाचे लहान मंगळसूत्र तसेच २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याची फिर्याद सौ. दिपाली गणपत शेडगे यांनी दिली आहे.
No comments