Breaking News

बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व : सचिन अहिवळे

All-round personality: Sachin Ahiwale
    आयु. सचिन रमेश अहिवळे म्हणजे एक अजातशत्रू व उत्तुंग व्यक्तिमत्त्व फलटण नगरपालिकेतील विद्यमान कार्यक्षम नगरसेवक, एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू नगरसेवक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. नगरसेवक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन सर. आपल्या प्रेमळ स्वभावाने मने जिंकणे हा त्यांचा स्थायीभाव. अत्यंत साधे राहणीमान असलेले सर आपल्या पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता गोरगरिबांपासून विरोधकापर्यंत सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असतात. हा माझा नाही, तो माझ्या प्रभागातला नाही असल्या पद्धतीची कारणे देताना, सचिन सरांना कुणी पाहिले नाही. म्हणून विरोधकांच्या मनात सुद्धा सचिन सरांविषयी आदर पाहायला मिळतो व नगरसेवक कसा बहुआयामी आणि अष्टपैलू असावा याचे मूर्तिमंत उदाहरण ते घालून देतात. कसली चमकोगिरी  किंवा नगरसेवक असल्याचा भंपकपणा कधी त्यांनी मिरवला नाही,म्हणून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनायला सरांना वेळ लागला नाही. माणूस त्याच्या कामाने मोठा होतो चमकोगिरी ने नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. एकाच कामाचे पन्नास, शंभर फोटो काढून मिरवण्यापेक्षा पन्नास, शंभर कामे करा लोकच तुम्हाला प्रसिद्धी देतील कारण माणसाचे काम बोलते आणि ज्याचे काम बोलते त्याला असल्या कृत्रिम प्रसिद्धीची गरज नसते हे सरांनी वेळोवेळी दाखवून दिले.
    कोरोना काळातील  त्यांचे भरीव काम खरा कोरोनायोद्धा असल्याची ग्वाही देते. अनेकांना दवाखाने उपलब्ध करून देण्यापासून गोरगरिबांची दोन वेळची भोजनव्यवस्था करून देणे यासारखी कामे त्यांनी त्यांच्या पदाच्या पलीकडे जाऊन कोणतीही जाहिरातीची अपेक्षा न करता दिवसरात्र केली व कोरोना सारख्या कठीण प्रसंगात लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.
    कोणाचे ऍडमिशन असू द्या, शिक्षणासाठी आर्थिक मदत असू द्या, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुकपर  सत्कार सोहळे असू द्या, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असुद्या, सचिन सर अथकपणे काम करताना दिसतील. या अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या शब्दबद्ध करणे कठीण आहे.
    अशा या गुणी लोकप्रतिनिधीला त्यांच्या राजकीय आयुष्यात लोकसेवेच्या अनेक संधी मिळोत..व त्यांची कीर्ती दिगंत चहूकडे पसरावी हीच सदिच्छा. अशा या आमच्या लोकप्रिय नेत्यास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
- सचिन अहिवळे मित्रपरिवार, 
मंगळवार पेठ, फलटण

No comments