Breaking News

राष्ट्रवादी ओबीसी पदाधिकाऱ्यांची मुंबईत राज्यस्तरीय बैठक : मिलिंद नेवसे

State level meeting of NCP OBC office bearers in Mumbai: Milind Nevese

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : केंद्र शासन महाराष्ट्रातील ओबीसींचे हक्क हिसकावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहे. केंद्राकडून राज्याला सापत्न भावाची वागणूक वारंवार दिली जात असल्याचे नमूद करीत ओबीसींचे राजकीय आरक्षण, ओबीसी समाज बांधवांवर वारंवार येत असलेले आर्थिक संकट, ओबीसी संघर्षाचा लढा यासह विविध बाबींसाठी बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये बुधवार दि. २५ मे रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.

      राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, सोलापुरचे पालकमंत्री ना. दत्ता मामा भरणे, रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे हे या बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी सांगितले आहे.

      सर्व मंत्रीगणांच्या मार्गदर्शनापूर्वी ओबीसी घटकातील विविध समाज बांधव, पदाधिकारी यांच्यासोबत चर्चासत्र तसेच त्यांना उद्भवणाऱ्या समस्या व आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदरील बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन मिलिंद नेवसे यांनी केले आहे.

No comments