Breaking News

शेत जमिनीच्या वादातुन दोन गटात हाणामारी ; २२ जणांवर गुन्हा दाखल

Fighting between two groups over farm land dispute; Crimes registered against 22 persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ एप्रिल -  मौजे टाकळवाडे ता. फलटण येथील इवरे व मिंड कुटूंबामधील एकुण २२ महिला व पुरुषांनी बेकायदेशीर जमाव जमवुन जमिनीमधील रस्त्याच्या कारणावरून गज, कुऱ्हाड, काठया, कोयत्याने एकमेकांना मारहाण केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१०/०४/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास मौजे टाकळवाडे ता. फलटण येथील इवरे व मिंड कुटूंबातील लोकांनी, जमिनीतील रस्त्याच्या कारणावरून बेकायदा जमाव जमून एकमेकांना काठी, गज, कुऱ्हाडीच्या सहाय्याने मारहाण करून एकमेकांना जखमी केले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला संशयित आरोपी नामे १) नानासो पोपट ईवरे वय ४० वर्षे २) उमेश हणमंत ईवरे वय ३९ वर्षे ३) अक्षय श्रीमंत ईवरे वय २५ वर्षे४) प्रशांत कुंडलिक ईवरे वय २९ वर्षे ५) कुंडलिक एकनाथ ईवरे ६) निलेश विठ्ठल ईवरे वय ३२ वर्षे ७) अजित बाळासो ईवरे वय ४४ वर्षे ८) शोभा हणमंत ईवरे ९) मिनाक्षी उमेश ईवरे वय ३५ वर्षे १०) मनिषा राजेंद्र ईवरे ११) रेखा नानासो ईवरे १२) हणमंत एकनाथ ईवरे वय ६५ वर्षे १३) श्रीमंत एकनाथ ईवरे वय ५५ वर्षे १४) विमल कुंडलिक ईवरे सर्व रा. टाकळवाडे ता. फलटण जि. सातारा यांच्या विरूध्द भादविस कलम ३२७, ३२४, ३२३, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    तसेच दुसऱ्या गटातील लोकांचे विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला संशयित आरोपी नामे १) बाळासो उत्तम मिंड वय ४० वर्षे २) छबुताई उत्तम मिंड ३) उत्तम जयसिंग मिंड वय ५७ वर्षे ४) किसन जयसिंग मिंड वय ३५ वर्षे ५) दादासो जयसिंग मिंड वय ६५ वर्षे ६) अजीत दादासो मिंड वय ३० वर्षे ७) रूपाली अजित मिंड वय २६ वर्षे सर्व रा. मिंड वस्ती टाकळवाडे ता. फलटण जि. सातारा यांच्या विरूध्द भादविस कलम ३२७, ३२४, ३२३, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपी यांना ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक  धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक व दत्तात्रय दराडे सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. 

No comments