शाळांच्या अनुदानप्रश्नी सभापतींच्या दालनात बैठकीनंतर निर्णय – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
Decision on school grant issue after meeting in the hall of the Legislative Council Speaker - Minister of State for School Education Bachchu Kadu
मुंबई : शाळांचे अनुदान, अघोषीत शाळांचा प्रश्न आणि शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नासंदर्भात सभापतींच्या दालनात बैठक घेण्याची सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. लक्षवेधी सूचनेवर सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार सदस्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, राज्यातील शाळांच्या अनुदानाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शाळांना वेळेत अनुदान देण्याबाबत एकसूत्रीपणा आणण्यावर भर आहे. याबाबतीत झालेल्या वेगवेगळ्या निर्णयांचे एकत्रीकरण करून हे प्रश्न निश्चित कालावधीत सोडविले पाहिजेत, याकडे आपण लक्ष देऊ. सभापतींच्या सूचनेनुसार त्यांच्या दालनात बैठक घेऊन त्यात सदस्यांनी आपली मते मांडली तर त्यावर निर्णय घेण्यात सुलभता येईल, असेही ते म्हणाले.
या चर्चेत विधानपरिषद सदस्य जयंत आसगांवकर, ड़ॉ. सुधीर तांबे, अभिजित वंजारी, विक्रम काळे, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला होता.
No comments