Breaking News

फलटण पंचायत समितीच्या प्रशासक पदी सौ.अमिता गावडे

Mrs. Amita Gawde as Administrator of Phaltan Panchayat Samiti

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुका पुढे गेल्या असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाल दि. १३ मार्च रोजी संपली असल्याने, रिक्त झालेल्या फलटण पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांचे अधिकार व कामाची जबाबदारी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.अमिता गावडे यांच्याकडे प्रशासक म्हणून सोपविण्यात आली आहे. 

    सातारा जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समितींचा कार्यकाल संपत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांचा पदभार प्रशासक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पारित केले आहेत. आगामी चार महिने किंवा नूतन सभापती व उपसभापती निवड होईपर्यंत सदरील आदेश लागू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

    फलटण पंचायत समितीचा कार्यकाल दि. १३ रोजी संपली असून मागील आठवड्यात पंचायत समितीची शेवटची सभा सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी सर्व सदस्यांचा उत्कृष्ट कामकाजाबाबत गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे यांनी प्रशस्तिपत्र देत सत्कार केला आहे.

No comments