Breaking News

चार दिवसात कारवाई करावी अन्यथा उपोषण - अनुप शहा ; गुन्ह्यांचा तपास डीवायएसपी करणार

Action should be taken within four days otherwise fasting - Anup Shah; Crimes will be investigated by DYSP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ मार्च - प्रशासन व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जी चर्चा झाली त्यानुसार, खा.रणजितसिंह यांनी आम्हाला उपोषण चार दिवस पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे आम्ही चार दिवस उपोषण पुढे ढकलत आहोत, परंतु या चार दिवसात आपण योग्य तपास करून कारवाई करावी अन्यथा आम्हाला उपोषण सुरू करावे लागेल असा इशारा देतानाच, दिगंबर आगवणे यांच्या विरोधात आमच्याकडून झालेल्या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे  यांच्याकडे न देता, दुसऱ्याकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी खासदार गटातर्फे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे केली. जनसमुदायाची मागणी विचारात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी त्वरित प्रश्न निकाली काढत, सदरील तपास प्रकरण हे स्वतःकडे घेऊन याचा तपास मी स्वतः करतो असे जाहीर केले.

    शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून, आम्ही समोरा - समोर उपोषण करण्यास मनाई केली आहे, आपण सर्वांनी चार दिवस थांबण्याचा निर्णय घेतला, तो चांगला असून आम्ही येत्या काही दिवसात तपास करून कारवाई करू असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी दिले. याप्रसंगी  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोक जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, जाकिरभाई मणेर, राजाभाऊ नागटिळे, मनोज कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

     लोकशाहीमध्ये उपोषणाला बसण्यासाठी माझी ना नाही, परंतु समोरासमोर उपोषण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून उपोषण करण्यात येत असेल तर त्या उपोषणाला पोलिस प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही असे पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.

    दिगंबर आगवणे यांनी खासदारांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीचा तपास हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला असून, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपाधीक्षक त्याचा तपास करीत आहेत आहे, त्याच पद्धतीने दिगंबर आगवणे यांच्या विरोधातही तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यांचाही तपास चालू आहे त्या अनुषंगाने आपण आगवणे यांच्याकडे उत्तर मागवले आहे, त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्याचा तपास करून, पुढील कारवाई करण्याबाबतची कार्यवाही सध्या चालू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

No comments