Breaking News

विरोधकांकडुन चहापानावर बहिष्कार!

Tea party boycott by opposit party

    मुंबई, दि. २१ :-  राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.  त्यापार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. हिवाळी  अधिवेशनात विरोधकांनी बोलू नये यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही. असा आरोप  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार कमी कालावधीत अधिवेशन घेऊन लोकशाहीला कुलूप लावण्याचे प्रयत्न करत आहे. अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही. राज्यात रोख शाहीचा कारभार सुरू असल्याचे  देवेंद्र फडणवीस म्हणाले. वर्षभरापासून 12 आमदार निलंबित आहे.  हे करणे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य आहे. या सरकारचा त्या आमदारांवर विश्वास नाही? असे म्हणत  देवेंद्र  फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला अधिवेशनापूर्वीच धारेवर धरले आहे.

No comments