Breaking News

निंभोरे येथे दाराचे लॉक तोडून सोन्याचे दागिने - चांदीची भांडी व रोख रक्कमेची चोरी

Gold jewelery - silverware and cash stolen at Nimbhore

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - निंभोरे ता. फलटण येथील सत्यजित रणवरे कुटुंबीय देवदर्शनासाठी त्रंबकेश्वर येथे गेले असता, अज्ञात चोरट्याने घराचे सेफ्टी डोअर व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून, कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व रोख रक्कम असा ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

    मौजे निंभोरे ता.फलटण येथील सत्यजीत सतिश रणवरे हे कुटुंबासमवेत दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी नाशिक, त्रंबकेश्वर येथे गेले होते. दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्रौ ९:३० वा. ते दिनांक दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजीचे सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान, मौजे निंभोरे ता. फलटण येथील राहते घरातील समोरील बाजुस असणाऱ्या सेफ्टी डोअरचे  कुलुप तोडुन, आतील दरवाजाचे लॅच तोडुन, घरात प्रवेश करुन, दोन्ही बेडरुममधील कपाटातील ६ ग्रॅम सोन्याची अंगठी, ६ ग्रॅम सोन्याची कर्णफुले, ४ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, ३६ हजार रुपये रोख रक्कम, एक चांदीचे डिझाईनचे ताट, चांदीचा बाउल, चांदीचा ग्लास, चांदीचे निरंजन असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याचे फिर्याद सत्यजित रणवरे यांनी दिले आहे.

No comments