४२ रेडे दाटीवाटीने भरून अवैध वाहतूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा ; ७ लाख २० हजरांचा माल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ डिसेंबर २०२१ - गोखळी ता. फलटण गावचे चौकात २ अशोक लेलेंड ट्रकामध्ये दाटीवाटीने ४२ रेडे भरून त्याची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी, वेळापूर ता.माळशिरस येथील दोघांवर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास मौजे गोखळी तालुका फलटण गावचे चौकात, सोमनाथ खंडू महत्रे वय २४ वर्षे रा.वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर याने त्याच्या ताब्यातील पांढरे रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे आरटीओ पासिंग एमएच ४५ ए २२१०मध्ये २३ रेडे दाटीवाटीने भरलेले तसेच रहीम इमाम शेख वय २५ वर्षे रा. वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर याने त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे आरटीओ पासिंग नंबर एमएच ४५ एएफ २३५१ मध्ये १९ रेडे दाटीवाटीने भरून व त्यांचे चाऱ्याची पाण्याची कोणतीही सोय न करता, तसेच गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, जनावरांना क्रूरतेने वागणूक दिली. याप्रकरणी एकूण ४२ रेडे याची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण ४२ रेडे जप्त करून त्यांच्या विरुद्ध भादवि कलम ३४ व पशु क्रूरता अधिनियमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे हे करीत आहेत.
No comments