Breaking News

लोणंद येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; एटीएम स्कार्पिओला बांधून ओढले

Attempt to blow up ATM at Lonand; The ATM tied up Scorpio and pulled

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा)  - लोणंद ता. खंडाळा येथील शासकीय विश्राम गृहाच्या शेजारी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे ए. टी. एम. अज्ञात चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. एटीएम मशीनचा डिस्प्ले मॉनिटर फोडून एटीएम मशीन  उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांना त्यात यश आले नाही.

    दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या  सुमारास मौजे लोणंद ता खंडाळा गावचे हददीत, निरा ते सातारा जाणारे रोडवर, शासकीय विश्राम गृहाच्या शेजारी असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे ए टी एम मध्ये अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून, सी. पी. यु,शटर असेंब्ली, ब्रॅकेट असेंब्ली, प्रेजेंटर, हुडडोअर,सिलिंगची व लाईटची तोडफोड करून, ए टी एम मशीन चोरण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद सुरज दिनकर साळुंखे रा. मांडवे ता. माळशिरस जि.सोलापूर यांनी दिली आहे.

    दरम्यान, चोरटे स्कार्पिओ गाडीमध्ये आले. व त्यांनी ए. टी. एम. मशीनला दोरीने स्कर्पिओ गाडीस बांधून, मशीन ओढुन चोरून घेवुन जाण्याचा प्रयत्न केला गेला असे, लोकांकडून समजले असल्याचे सुरज दिनकर साळुंखे रा. मांडवे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

No comments