Breaking News

श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ कि.मी. सायकल राईड

On the occasion of Sanjeevraje's birthday, 57 km. Bicycle ride

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ ऑक्टोबर -  सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शनिवार  दिनांक ९ ऑक्टोबर रोजीच्या  ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, फलटण सायकल असोसिएशन तर्फे  रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी  ५७ कि.मी. सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे.

    रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी  पहाटे ५:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सायकल राहील चा शुभारंभ होईल. सायकल राईड मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/mXhWZ2FKURPKEufg6 या लिंक वरुन, आपले रजिस्ट्रेशन करावे. सायकल राईड पूर्ण करणाऱ्या सभासदांना एक आकर्षक मेडल आणि सर्टिफिकेट मिळणार आहे.

  सायकल राईडचा मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण - सांगवी - बारामती (अभिराज लॉन्स) - सांगवी - फलटण (बारामती पूल) - फलटण - नाना पाटील चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक - डेक्कन चौक - महात्मा फुले चौक - मुधोजी क्लब मैदान येथे सायकल राईड समाप्त होईल. त्यांनतर त्याच ठिकाणी समारोप व बक्षीस वितरण समारंभ होईल.

No comments