Breaking News

फलटण येथे आघोरी पूजा ; कासवाचा बळी

Aghori pooja was performed at Phaltan and the turtle was sacrificed

    फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि. १७ ऑक्टोबर -  पूर्व दिशेला तोंड करून कासव ठेवले आहे, त्याच्या अवतीभवती हळद, कुंकू, रांगोळी व इतर साहित्य पडलेले होते... नक्कीच अंधश्रद्धेतून किंवा पैसे मिळवण्याच्या अमिषातून एखादी अघोरी पूजा त्या ठिकाणी झाल्याचे दिसत होते.... दसऱ्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे दि. १३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीला फलटणच्या विमानतळावर दिसलेले हे दृश्य म्हणजे, अंधश्रद्धेतून किंवा पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी करण्यात आलेली आघोरी पूजा दिसून येत होती, अंधश्रद्धेतुन एका निरपराध कासवाचा बळी दिला गेला होता. 

    सध्या सातारा जिल्ह्यात अंधश्रद्धांच्या आघोरी पूजांना उत आला असून, मागील सप्टेंबर महिन्यातच भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्मशान भूमीत एका अल्पवयीन मुलीला बसवून, अघोरी पूजा करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अशा घटनांना वेळीच आवर घातला नाही तर, करनी करणे, बळी देणे, घातपात करणे अशी थोतांड पुन्हा सुरू झाल्याशिवाय राहणार नाहीत.

    फलटणच्या विमानतळात आघोरी पूजा झाल्याचे दिसले, त्यावेळी त्या कासवाचा बळी  गेला होता. पुजा केलेल्या जागेवर कपडा टाकून, त्याच्यावर नख्या असणारं कासव ठेवले होते. हळद-कुंकू, फुले पसरून, रांगोळी सारखी पांढरी पावडर पसरली होती,  पूजेचे इतर साहित्य ठेवलेले दिसत होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ही आघोरी पूजा करून, आपले इप्सित साध्य करण्यासाठी त्या  कासवाचा बळी दिलेला दिसत होते. अंधश्रद्धेतून प्राण्यांचा बळी देणे हे बेकायदेशीर असून, अशाप्रकारे आघोरी पूजा, बळी देणे व इतर काळी जादू  करण्यास कायद्याने बंदी आहे, या गुन्ह्यास महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अनुसार तुरुंगवास व दंडाची शिक्षा अशी तरतूद आहे.

No comments