फलटण पोलिस स्टेशनला बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.७ सप्टेंबर - फलटण शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे चारचाकी, तीनचाकी व मोटार सायकल बेवारस व गुन्ह्यात जप्त केलेल्या ५६ गाड्यांचा लिलाव पोलीस अधिक्षक सातारा यांच्या आदेशाने करावयाचा असल्याने, ज्यांच्या मोटार सायकल व चार चाकी तसचे तिन चाकी वाहने चोरीस गेलेली आहेत, त्यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे दिनांक १५/०९/२०२१ रोजी सकाळी १०:०० वाजे पर्यंत आपला मालकी हक्क सिध्द करून घेवुन जायची आहेत. जे कोणी लिलाव घेण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत त्यानी दिनांक १५/०९/२०२१ रोजी सकाळी १०:०० वा फलटण शहर पोलीस ठाणेचे आवारात लिलाव प्रक्रिया सुरू होण्या पूर्वी हजर राहावे असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.
सदर बेवारस व गुन्ह्यात जप्त मोटार सायकल व चार चाकी / तीनचाकी वाहनांची यांदी फलटण शहर पोलीस ठाणे आवारात लावण्यात आलेली आहे तरी ज्याची वाहने चोरीस गेली असतील त्यानी फलटण शहर पोलीस ठाणे येथे कागदपत्रासह हजर राहावे. त्या नंतर चारचाकी तिनचाकी व मोटार सायकल बेवारस व गुन्ह्यात जप्त वाहनांचा लिलाव झाल्या नंतर कोणताही हक्क किंवा दावा विचारात घेण्यात येणार नाही.
लिलावा मध्ये भाग घेणा-याकडे स्क्रॅप लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच अनामत रक्कम रूपये १५,०००/- (पंधरा हजार रूपये फक्त) भरणे आवश्यक आहे.
बेवारस वाहनांची यादी
No comments