Breaking News

खासदार शरद पवार यांची श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे सदिच्छा भेट

MP Sharad Pawar's visit to Shrimant Shivaji Raje Horticulture College and Agriculture College, Phaltan

    फलटण दि.३ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष खासदार शरद पवार,  यांनी आज दि ३ सप्टेंबर रोजी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे सदिच्छा भेट दिली.  त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,  सहकार मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा बाळासाहेब पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषद सातारा माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्री सदाशिव सातव माजी नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सभापती पंचायत समिती, फलटण,  बाळासाहेब  शेंडे, चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण, धनंजय पवार, फलटण सहकारी दुध संघ, फलटण,  विजयराव कोलते, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, कृषि  शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच हेमंत रानडे, खजिनदार, फलटण एज्युकेशन,सोसायटी , शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ  राजवैद्य,, नितीन गांधी, शरद रणवरे, सदस्य    गव्र्हनिंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन,सोसायटी, फलटण , अरविंद निकम सर, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन,सोसायटी, फलटण यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते खासदार शरदचंद्रजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ना. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला व विजय कोलते यांचाही सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

खासदर पवारसाहेब यांची मालोजीराजे शैक्षणिक संकुल येथे आजपर्यंतची चौथी भेट होती सन 1975 साली महाराष्ट्र राज्याचे कृषि  मंत्री असताना प्रथम भेट झाली होती. त्यानंतर सन 2009 साली महाविद्यालयाच्या इमारत उद्घाटन प्रसंगी व 2011 साली सातारा जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीसाठी भेट झाली.  आज त्यांची चौथी भेट झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.  एस.डी. निंबाळकर सर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल सविस्तर सादरीकरण केले.  महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, विद्यार्थांचे यश व भविष्यातील योजनांबाबत उपस्थितांना माहिती दिली.  तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांनी गोविंद डेअरीतील कमी खर्चातील मूरघास तंत्रज्ञान याविषयी सादरीकरण केले. 

याप्रसंगी खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी सर्व सादरीकरणाची बारकाईने माहिती घेऊन  श्रीमंत मालोजीराजे  नाईक निंबाळकर साहेब यांनी चालू केलेल्या शिक्षणाचा वारसा व विचार घेऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतॄत्वात व मार्गदर्शनाखाली फलटण एज्यकेशन सोसायटी मार्फत कार्य केले जात आहे.  यासाठी समाधान व्यव्त केले. आधुनिक विज्ञानाचा आधार घेउन शेती व दुग्ध व्यवसाय इत्यादी क्षेत्रात येथे काम सुरू आहे व ते जोमाने ते काम करत आहेत हे पाहुन आनंद व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि  महाविद्यालयाचे प्राचार्य, अध्यापक व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन देखील केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण कृषि  महाविद्यालयाच्या स्टाफचा ग्रुप फोटो घेण्यात आला.    

No comments