Breaking News

अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल

Illegal sand mining and smuggling; Charges filed against three

    फलटण दि.२२ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - दुधेबावी ता. फलटण गावच्या हद्दीतील ओढ्यातून अनधिकृतपणे वाळू उपसा करून, ती वाळू आयशर टिप्पर या चारचाकी वाहनाने  चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 8 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21/09/2021 रोजी  00.30 वाजण्याच्या सुमारास मौजे दुधेबावी ता. फलटण गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, फलटण ते दहिवडी जाणाऱ्या डांबरी रोडवर हॉटेल शौर्याचे समोर, विटकरी रंगाचा आयशर टिप्पर मोडेल नंबर 1080 असलेला समोरून येत असताना मिळून आला, त्यास थांबवून त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये 14000 रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू वाहतूक करीत असताना आढळले.  1) अमोल सोमनाथ राठोड रा. झिरपे गल्ली फलटण  2) सागर राजेंद्र जाधव रा. झिरपे गल्ली फलटण 3) ओम सोडमिसे ( पूर्ण नाव माहित नाही) रा. सोमंथळी ता. फलटण यांनी संगनमताने दुधेबावी गावचे ओढ्यातून  अनधिकृतपणे अतिक्रमण करून खड्डा काढून, वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, उत्खनन करून, पर्यावरणाची हानी व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करून, वाहन चालक बेकायदेशीरपणे चोरटी वाळू वाहतूक करीत असताना मिळून आला.  

    या प्रकरणी वरील तिघांवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी एक आरोपी अटक करण्यात आले आहे, तर  1080 मॉडेल आयशर टिप्पर किंमत  8,50,000/- रुपये व  टिप्पर मध्ये असलेली दोन ब्रास  वाळू त्याची किंमत 14,000 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार एस. बी. राऊत हे करीत आहेत.

No comments