लॉन्ड्रीवाल्या यादव भाऊंचा प्रामाणिकपणा
![]() |
| लॉन्ड्री चालक दत्तात्रय यादव यांचा फेटा बांधून सत्कार करताना मान्यवर |
Honesty of laundryman Dattatraya Yadav
कोळकी (प्रतिनिधी) - एखादी वस्तु हरवली किंवा पडली तर ती वस्तु, पुन्हा मिळणे किंवा ज्याला सापडली त्याने ती परत आणून दिली असा योग दुर्मिळच येतो, जाधववाडी येथील लॉन्ड्री चालकानेही असाच प्रामाणिकपणा करून, ग्राहकाची राहिलेली रोख रक्कम परत दिली आहे.
जाधववाडी ता .फलटण येथील अक्षत रेसिडेन्सी, पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील यादव लॉन्ड्री येथे भडकमकरनगर, फलटण येथील एक गृहस्थ इस्त्रीसाठी कपडे ठेऊन गेले. लॉन्ड्रीचे चालक दत्तात्रय यादव यांनी कपडे इस्त्रीसाठी घेतले असता, त्यात त्यांना रू. 15 हजार आढळून आले. त्या रकमेचा किंचीतही मोह न ठेवता सर्व रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे परत केली. लॉन्ड्रीचे चालक दत्तात्रय यादव यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामगिरीबद्दल लॉन्ड्रीचे चालक दत्तात्रय यादव यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

No comments