Breaking News

सातारा जिल्ह्यात 540 कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  1 died and 540 corona positive

67 जणांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 540 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून 1  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची  माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

    जावली 28 (9861), कराड 50 (38179), खंडाळा 22 (13902), खटाव 67 (24560), कोरेगांव 57 (21268), माण 43 (17087), महाबळेश्वर 3 (4595), पाटण 7 (9989), फलटण 118(35372), सातारा 110(49778), वाई 27 (15470) व इतर 8 (1937) असे  आज अखेर एकूण 241998 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6060कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 67 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *एकूण नमूने – 1846323

*एकूण बाधित – 241998

*घरी सोडण्यात आलेले 228343

*मृत्यू -6060

*उपचारार्थ रुग्ण- 11009

No comments