Breaking News

सातारा जिल्ह्यात410 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  1 died and 410 corona positive

254 जणांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  410 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

    जावली 8 (9899), कराड 57 (38455), खंडाळा 6 (13971), खटाव 52 (24897), कोरेगांव 29 (21453), माण 26 (172302), महाबळेश्वर 3 (4628), पाटण 9 (10115), फलटण 105 (35945), सातारा 89 (50280), वाई 7 (15567) व इतर 18  (1991) असे  आज अखेर एकूण 244504 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  माण 1  असे एकूण 1 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6018 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  254  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *एकूण नमूने – 1922440

*एकूण बाधित –244504

*घरी सोडण्यात आलेले 232221

*मृत्यू -6018

*उपचारार्थ रुग्ण--9211

No comments