ट्रॅजडी किंग दिलीप कुमार
Tragedy King Dilip Kumar
ट्रॅजडी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी 63 चित्रपटात काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. आशा या हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग ज्येष्ठ अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.
सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 साली त्यांचा जन्म झाला. त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. त्यांचे वडील फळ व्यापारी होते.दिलीप कुमार सायरा बानो यांच्याबरोबर 11 ऑक्टोबर 1966 ला झाला.
फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना 8 वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्या नावावर आहे. दिलीपकुमार हे फक्त अभिनेतेच होते असं नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. सन 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.
'ज्वार भाटा' हा त्यांचा पहिला चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुघल-ए-आजम, नया दौर, देवदास, या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), राम और शाम (1967), 'क्रांती' (1981), शक्ती (1982), मशाल (1984, 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 60 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.
मुगल-ए-आजम हा दिलीपकुमार यांचा क्लासिक चित्रपट ‘मुगल-ए-आजम’ 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. त्या काळात, दीड कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कोटय़वधींचा व्यवसाय केला होता. दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले. या चित्रपटाने नॅशनल ते फिल्मफेअर अवॉर्डपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले होते.
नया दौर या चित्रपटात दिलीपकुमार यांच्यासह वैजयंती माला महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट मशीन आणि माणूस यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. दिलीप कुमार यांच्या या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती, तसेच सर्वांना भावनिक केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन बी.आर.चोप्रा यांनी केले होते.
गंगा जमुना चित्रपटात दिलीप कुमार या चित्रपटात एका अल्लड गावकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ते भोजपुरी बोलत होते. यासाठी तो टिपिकल भोजपुरी शिकले होते.
देवदास चित्रपटात दिलीप कुमार यांच्या ‘देवदास’ या चित्रपटापासून वैजयंती माला यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट बॉलिवूडसाठी एक उदाहरण ठरला.
राम और श्याम चित्रपटात दिलीप कुमारच्या ‘राम और श्याम’ या क्लासिक चित्रपटामध्ये वहीदा रहमान आणि मुमताज महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी डबल रोल साकारला होता. दोन्ही पात्रं एकमेकांपेक्षा वेगळी होती आणि त्यांनी ही पात्रं उत्तम प्रकारे निभावली.
- अॅड. रोहित अहिवळे (फलटण)







No comments