Breaking News

ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांचे निधन

Tragedy King Dilip Kumar passes away

    गंधवार्ता वृत्तसेवा, दि. 7 जुलै - हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग ज्येष्ठ अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

    काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    दिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली होती. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

    

    फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.

दिलीप कुमार यांना मान्यवरांच्या श्रद्धांजली 

राष्ट्रपति रामनाथ कोविंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 

उपमुख्यमंत्री अजित पवार 

विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस 

अभिनेते अमिताभ बच्चन 

 अभिनेते अनिल कपुर

 अभिनेते कमल हासन 

 अभिनेते सनी देओल 

 अभिनेते चिरंजीवी 

 खेळाडू  शाहीद आफ्रिदी

 अभिनेते राज बब्बर

अभिनेते अनुपम खेर

 अभिनेते संजय दत्त

No comments