Breaking News

अ‍ॅलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्ती कोविड-19 प्रतिबंधक लस घेऊ शकतात का ?

Can people with allergies get vaccinated ?

    कोविड लसी संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीवरच्या विशेष कार्यक्रमात कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेच्या मनातल्या विविध शंकांचे निरसन केले.  

अ‍ॅलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्ती कोविड-19 ची लस घेऊ शकतात का ?

Can people with allergies get vaccinated ?

डॉ. व्ही. के. पॉल  : एखाद्या व्यक्तीला अ‍ॅलर्जीचा लक्षणीय त्रास असेल तर केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच कोविडची लस घ्यावी. मात्र सर्दी, त्वचेची अ‍ॅलर्जी यासारखी किरकोळ अ‍ॅलर्जी असेल तर लस घेण्यासाठी टाळाटाळ करू नये.

डॉ. रणदीप गुलेरिया : अ‍ॅलर्जीसाठी आधीपासूनच औषध घेणाऱ्या व्यक्तींनी ते थांबवू नये, लस घेण्याच्या काळातही त्यांनी आपली औषधे नियमित सुरूच ठेवावीत. लसीमुळे अ‍ॅलर्जी निर्माण झाल्यास त्यासाठीच्या व्यवस्थापनासाठी सर्व लसीकरण केंद्रावर व्यवस्था करण्यात आलेली आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच तीव्र अलर्जी असली तरी औषध सुरु ठेवून लस घेण्याचा आमचा सल्ला राहील.

No comments