Breaking News

2 खून व बलात्काराच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी जेरबंद

Accused who has been absconding for 11 years arrested ;   accused in murder and rape case arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ जुलै -  2 खून व बलात्काराच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या  आरोपीस फलटण शहर पोलिसांनी  जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ११ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीस पोलिसांनी इंदापूर तालुक्यात जाऊन जेरबंद केले. 2010 साली सोनवडी तालुका फलटण येथे घडलेल्या खून प्रकरणातील हा आरोपी गेल्या 11 वर्षांपासून फरार होता.  2019 साली या आरोपीविरुद्ध लोणंद पोलिस स्टेशन अंतर्गत आणखी एक खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच 2019 मध्ये फलटण ग्रामीण पोलिस  स्टेशन अंतर्गत अपहरण व बलात्काराचा  गुन्हा या आरोपीवर दाखल करण्यात आला होता. 

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 जुलै 2010 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास सोनवडी बुद्रुक तालुका फलटण येथे, आरोपी 1. रब्या भगवान काळे 2. केनशा भगवान काळे 3. फुलाबाई भगवान काळे 4. भगवान मुगुटराव काळे 5. आलिशान हुंकार भोसले अनुक्रमांक  1, 3, 4 रा. सोनवडी बुद्रुक तालुका फलटण व  अ. नं. 2 न्याहळी  तालुका इंदापूर, अ. नं. 5 रा. अकलूज ता.  माळशिरस यांनी अनैतिक संबंध व पैशाचे कारणावरून सौ. राणी  रवींद्र काळे राहणार सोनेवाडी बुद्रुक तालुका फलटण हिचा खून केला होता. आरोपी एक ते पाच यांनी आपापसात संगणमत करून वडील जेलमध्ये असताना खर्च केलेले पैसे का देत नाही व वडील आरोपी नंबर 1 हा जेलमध्ये असताना दीर बाळू भगवान काळे याच्याशी अनैतिक संबंध का ठेवले, या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी सागर रवींद्र काळे यांची आई राणी रवींद्र काळे राहणार सोनवडी बुद्रुक तालुका फलटण ही, झोपेत असताना सोनवडी गावी घरामध्ये अंगणात डोक्यात दगड घालून खून केला होता. 

   सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपी 1,3,4,5 यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलेले होते, आरोपी  नंबर 2 केनशा भगवान काळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर गुन्ह्यातील आरोपी 3,4,5 यांचा निकाल लागला असून आरोपी 1 व 2 यांचा निकाल राखून ठेवला आहे.

     उपरोक्त गुन्ह्यातील फरार आरोपी केनशा भगवान काळे घटना घडल्यापासून (सुमारे ११ वर्षांपासून) फरार होता. फलटण शहर पोलीस स्टेशन येथे नेमणूक असणारे  पोलीस नाईक 19 नितीन चतुरे यांना बातमीदारामार्फत  नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी केनशा भगवान काळे हा निमगाव केतकी तालुका इंदापुर जिल्हा पुणे येथील एका हॉटेलवर येणार असल्याची  खात्रीशीर बातमी मिळाल्या नंतर, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे  व  फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक  संदीप बनकर, पोलीस नाईक 19 नितीन चतुरे, पोलीस शिपाई 592 सुजीत मेंगावडे पोलीस शिपाई 2531 सांडगे, पोलीस शिपाई 2529 जगताप असे पथक तयार केले. त्यांना योग्य त्या सूचना देऊन  कामगिरीवर रवाना केले असता, पथकातील लोकांनी सदर आरोपीस  मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

          सदर आरोपी विरुद्ध लोणंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 196/ 2019 भादवि कलम 302,34  व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 288/2019 भा द वि 376(2),(f)(i), 376 (3), 342,363,366, (a),34 पोस्को 4,6,8,12,17 प्रमाणे गुन्हे दाखल असून, सदर गुन्ह्यात आरोपी फरार आहे. याशिवाय त्याच्याकडून फलटण शहरातील व आसपासचे भागातील घरफोडी सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बनकर हे करीत आहोत.

No comments