फलटण तालुक्यात 88 बाधित ; सर्वाधिक कोळकी - कुसुर प्रत्येकी 11
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 8 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 86 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
आज दि. 8 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 88 बाधित आहेत. 88 चाचण्यांमध्ये 26 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 62 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात 86 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 11, कुसुर 11, राजुरी 10, बरड 2, काळज 1, कापडगाव 5, कोरेगाव 1, कुरवली बु 1, मठाचीवाडी 1, निंबळक 1, फरांदवाडी 1, फडतरवाडी 3, साखरवाडी 4, सांगवी 3, सासवड 1, सोमंथळी 1, उपळवे 2, वाखरी 1, वडगाव 3, वडले 1, तरडगाव 2, ताथवडा 2, तावडी 2, जाधववाडी 2, अलगुडेवाडी 2, खामगाव 1, पिंपरद 2, शिंदेवाडी 1, विडणी 1, पवारवाडी 1, राजाळे 2, आळजापुर 1, होळ 1, पिरवाडी सातारा 1, भोंडवेवाडी ता बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments