Breaking News

नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार - नगरसेवक अजय माळवे

Will strive to solve the problems of the citizens - Corporator Ajay Malve

    फलटण (प्रतिनिधी ) शहरांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पादूर्भावामुळे गेले अनेक दिवसांपासून  कडक लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे तसेच छोटे-मोठे व्यवसायिक यांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत  कांही कुटुंबांना जगणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण  येथील प्रभाग क्रमांक १० मधील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप नगरसेवक अजय माळवे यांंनी केले.                     

    गहू,  तांदूळ,  तूर डाळ,  पोहे,  शेंगदाणे, चहा ,  साखर , गोङेतेल,  मीठ , कांदा लसूण चटणी अश्या १० प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू या  कीट   मध्ये आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये सातत्याने  नागरिकांच्या हिताची कामे करून  नागरिकांना नेहमीच दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पहिल्या लाटेमध्ये सुध्दा प्रभाग क्रमांक १० मधील  नागरिकांना जिवनावश्यक किट,  जंतूनाशक फवारणी अन्नछञ आदीच्यां माध्यमातून मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. भविष्यातही प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचेही नगरसेवक अजय माळवे यांनी स्पष्ट केले.                 

     यावेळी अमरसिंह खानविलकर प्रकाश तेली , तात्या तेली , संदिप बिङवे , राजू बिङवे नाना पवार , महेश राऊत , संतोष निंबाळकर , हर्षल निंबाळकर उपस्थीत होते.

No comments