Breaking News

पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

Appeal to farmers to participate in crop competition
    सातारा  (जिमाका): खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येणार आहे. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

No comments