भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी अलंकार पवार यांची निवड
खंडाळा (प्रतिनिधी) - भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनदादा भोसले व भाजपा खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध दादा गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस यशराजभैय्या भोसले यांच्या सुचनेनुसार खंडाळा मंडलातुन श्री अलंकार अर्जुन पवार यांची सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे यांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर केली आहे.
याप्रसंगी खंडाळा शहराध्यक्ष जितेंद्र गाढवे, खंडाळा तालुका संघटक सरचिटणीस अलंकार सुतार, उद्योग आघाडी अध्यक्ष रविंद्र ढमाळ, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे, त्र्यंबकराव पवार उपस्थित होते.
No comments