Breaking News

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व दुकानांवर कारवाई; ५२ हजार रुपये दंड वसूल

Action against citizens and shops violating curfew order
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,  दिनांक २८ जून २०२१ रोजी पोलीस विभाग, महसूल विभाग, नगरपालिका विभाग यांनी संयुक्तरीत्या फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील, प्रमुख चौकातून नाकाबंदी पॉईंट नेमुन   उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप  तसेच  उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तसेच विनाकारण फिरणाऱ्या  नागरिक यांच्यावर कारवाई करून,  त्यांच्याकडून ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

    सदर कारवाई मध्ये विनाकारण फिरणाऱ्या १७ जणांच्या वर केसेस करून त्यांच्याकडून ८५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विना मास्क फिरणाऱ्या ११ नागरिकांच्या वर कारवाई करत त्यांच्याकडून २२०० रुपये दंड वसूल केला.

    संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापना (दुकाने) यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून १९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ९६ नागरिकांच्या वर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त केलेल्या कारवाई असे एकूण ५२ हजार रुपये दंड वसूल केला. 
         फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण कोणीही बाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करून,  जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने देण्यात आला आहे.

No comments