Breaking News

झिरपवाडी येथील ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीत कोरोना उपचार केंद्र सुरू करावे अन्यथा आंदोलन - दशरथ फुले

Corona treatment center should be started in the building of rural hospital at Zirapwadi otherwise agitation - Dashrath Phule

    फलटण  (प्रतिनिधी) -: फलटण शहर व तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना, वाढत्या रुग्ण संख्येला वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी झिरपवाडी, ता. फलटण येथील गिरवी रोडवरील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत तातडीने दुरुस्त करुन घेऊन, त्याचा वापर कोरोना उपचार केंद्रासाठी त्वरित वापर करावा अन्यथा ! तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा   सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदना व्दारे दिला आहे.

     फलटण येथील गिरवी रोडवर झिरपवाडी ग्रामपंंचायत हद्दीत ३० ते ३५ वर्षापूर्वी ८ एकर जागेत लाखो रूपये खर्चकरून रूग्णालय उभारण्यात आले, त्या वेळी सुसज्ज   इमारत, आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला, असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर, सन १९९७ मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर फलटण येथे आले असताना,  सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना ग्रामीण रुग्णालयाची फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांना गरज आहे, त्यासाठी रुग्णालय उभे करुन सर्व साधने सुविधा अगदी आवश्यक डॉक्टर्स व अन्य अधिकारी कर्मचारी नियुक्त करुनही सदर रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देत ते तातडीने सुरु करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्याची विनंती केली होती, त्यानंतर सदर ग्रामीण रुग्णालय सुरु झाले मात्र ते पूर्ण क्षमतेने कधीही सुरु करण्यात आले नाही आणि अखेर बंद करण्यात आले. त्या नंतर हे ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे या अनेक वर्षे संघर्ष तसेच पाठपुरावा केला परंतु याला फारसे यश आले नाही 

     कोरोनाची पैहिली लाट सुरू झाले नंतर हे ग्रामीण रूग्णालय सुरू करावे म्हणून पुन्हा मागणी केली त्या वेळी  झिरपवाडी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीत भागीदारी त्तत्वावर संसर्गजन्य आजारासाठी रूग्णालय उभारण्याबाबद विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर २० चे दरम्यान  झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता, या वेळी या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार दिपकराव चव्हाण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी आद्यप कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही.

        दुसऱ्या लाटेत  फलटण शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांच्यासाठी शहरातील वैद्यकीय सेवा सुविधा पुरेशा नसल्याच्या पार्श्वभूमीवर, वास्तविक प्रशासनाने सदर ग्रामीण रुग्णालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करुन घेऊन, तेथे कोरोना उपचार केंद्र तातडीने उभे करण्याची आवश्यकता होती. मात्र गेले ७ ते ८ महिने केवळ त्याच्या दुरुस्ती देखभालीचे आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून सदर इमारत पुन्हा एकदा दुर्लक्षीत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त करीत सदर इमारती साठी करण्यात आलेले आराखडे, अंदाजपत्रक तातडीने मंजूर करुन सदर इमारतीत कोरोना उपचार केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.

      कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुर्णपणे गडबलेली आहे कोरोनाने आजारी असणाऱ्या रूग्णांना बेड तसेच औषध उपचार वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे , शहरात असणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रूग्णाना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असून ज्यांची परिस्थिती चांगली आहे असे लोक या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सहन करित आहेत पंरतु सर्वसामान्य तसेच गोरगरिब कुंटुंबाला या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सोसणे अशक्य आहे यासाठी गोरगरीब रूग्णाना उपचार मिळण्यासाठी या शासकीय रूग्णालयाची आवश्यकता असल्याचे दशरथ फुले यांनी या निवेदनात म्हटले आहे .

  तिसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यासाठी रूग्णांना या जिवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.

   सदर इमारत गेली २०/२५ वर्षे दुर्लक्षीत राहिल्याने इमारतीच्या दारे, खिडक्या अज्ञाताने काढून नेल्या असून अन्य नुकसान झाले आहे, तथापी प्रशासनाने रुग्णालय इमारत तातडीने दुरुस्त करुन तेथे कोरोना उपचार केंद्र लगेच सुरु करावे, दुसऱ्या टप्प्यात अधिकारी/कर्मचारी निवासस्थाने दुरुस्त करुन नंतर तेथे विलगीकरण व अन्य कक्ष उभारता येतील परंतू मुख्य इमारत तातडीने दुरुस्त करुन तेथे आगामी सप्ताहात कोरोना उपचार केंद्र सुरु करावे अन्यथा मोर्चा उपोषण आत्मदहन सारखे आंदोलन इशारा  दशरथ फुले यांनी दिला  आहे.या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, उपविभागीय अधिकारी फलटण यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

No comments