दुकाने - व्यापार ठराविक कालावधीत किंवा एक दिवसाआड सुरू करण्यास परवानगी द्या - व्यापारी संघनटनांची मागणी
![]() |
| उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदन देताना व्यापारी संघटनांचे पदाधिकारी |
Allow shops to start trading at regular intervals or within a day - demanded by trade unions
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांनी निर्बंध वाढवत, अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील व्यापारी संघटना व असोसिएशन यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण व फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन दुकाने व व्यापार ठराविक कालावधीत किंवा एक दिवसाआड पूर्ण सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
फलटण व्यापारी महासंघ सर्व असोसिएशन्स पदाधिकारी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण, मुख्याधिकारी फलटण, पोलीस डी वाय एस पी फलटण यांना महासंघाच्या वतीने व्यापाऱ्यांचे निवेदन दिलेले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की,
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिककाळ बंद राहिल्याने व्यापारी, छोटे व्यावसाईक, हातगाडीवाले, वडापाव, वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते त्याचप्रमाणे या व्यवसायातील नोकरदार, रिक्षा, माल वाहतुकीचे वाहनघारक वगैरे सर्व धटकांचे मोठे नुकसान झाले असून आता परत दि. ५ एप्रिल २०२१ रोजी आपण काढलेल्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जो आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे त्यामध्ये राज्यातील आठवड्यात दोन दिवस संपूर्ण व्यापार बंद ठेवायचा आहे. परंतू आपल्या आदेशानुसार हा संपूर्ण एक महिना बंद ठेवायचा आहे.
व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शहरातील कापड, स्टेशनरी, कटलरी, फर्निचर, खेळणी, सौंदर्य प्रसाधने व महिलांविषयक वस्तूंची दुकाने, बांधकाम साहित्य, पुस्तक व शालेय स्टेशनरी, सराफ, मोबाईल विक्रेते, ऑटोमोबाईल, गरिज, हार्डवेअर, प्रिंटींग प्रेस, फेंब्रिकेशन वगैरे विविध प्रकारचे व्यावसाईक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी प्रांताधिकारी यांची आज दि. ७/४/२०२१ रोजी भेट घेऊन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी करीत आहोत.
फलटण शहर व्यापाऱ्यांनी लॉक डाऊन व अन्य सर्व सूचनांचे पालन करुन प्रसंगी नुकसान सोसून व्यापार व्यवहार बंद ठेवले. तसेच मागील लॉकडाऊन काळात काही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप, शहरात शासन/प्रशासन माध्यमातून सुरू असलेल्या अन्न छत्राना सहकार्य किंवा करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना सहकार्याची भूमिका येथील व्यापाऱ्यांनी व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था/ संघटनांच्या माध्यमातून केलेली आहे. नगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या अन्न छत्राना सहकार्य किंवा करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना सहकार्याची भूमिका येथील व्यापाऱ्यांनी व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था/ संघटनांच्या माध्यमातून केलेली आहे.
व्यापारी, बांधकाम क्षेत्रे, आँटोमोबाईल गरेज तसेच विविध व्यवसायांच्या ठिकाणी अनेक कामगार काम करीत असून आज त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठ काही प्रमाणात सुरु झाल्यास त्यांच्या संसारालासुद्धा थोडाफार हातभार लागेल. यासाठी शहरातील व्यापारी दुकाने, ऑटामोबाईल गॅरेज, बांधकाम क्षेत्रातील कामे, इतर व्यवसाय दैनंदिन ठराविक कालावधीत किंवा एक आड एक दिवस पूर्ण सुरु करण्यास परवानगी देण्याची आम्ही विनंती करीत आहोत.
मे महिन्याची सुट्टी लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी लहान मुलांची खेळणी व अन्य साहित्याची मोठी खरेदी केली. गुढी पाडवा, अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर लोक चार चाकी/दुचाकी वाहने खरेदी करतात त्याचा मोठा स्टॉक सदर व्यापाच्यांनी केला आहे. अनेक बांधकामे पूर्ण करून वरील सणाच्या पार्श्वभूमीवर त्याचा ताबा देण्याची प्रथा असल्याने त्यामध्ये बांधकाम व्यावसाईकांनी केलेली गुंतवणूक वगैरे सर्व व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी/गुंतवणूक अडकून पडली आहे, सदर व्यापान्यांचा बाकीच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे, दुकाने बंद असली तरी जागा भाडे, वीज बिल, म्युनिसिपल कर वगैरे खर्च सुरु आहेत त्यातून व्यापारी मेटाकुटीला आला असल्याने बाजारपेठ सुरु होऊन चलन फिरण्याची आवश्यकता आहे. त्यातून व्यापारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकानाही दिलासा मिळणार असल्याने फलटणची बाजारपेठ त्वरित सुरु करावी अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत.
तरी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण आम्हाला व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही आमचे व्यवसाय करू त्याकरिता आपण वेळवेळी दिलेल्या कडक निर्बंधाचेही पालन करण्यास तयार आहोत. तरी व्यवसाय/व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी ही विनंती.



No comments