Breaking News

आई सोबत बाहेर गेलेल्या 4 वर्षीय बलिकेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

4-year-old girl dies in two-wheeler collision

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण -  ढवळेवाडी ता. फलटण येथे आईबरोबर बाथरूमवरून परत येत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने 4 वर्षीय बालिकेस धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९:३० वा चे सुमारास ढवळेवाडी ता. फलटण गावचे हद्दीत उमेश नरसिंग पवार यांच्या घरा शेजारी निंभोरे ते मिरगाव जाणारे रोडवर नरसिंग पवार यांची भावजय सौ भारती मंगेश पवार ही तिची मुलगी अतिषा मंगेश पवार वय 4 वर्षे हीचेसह बाथरुमला गेली होती, ती बाथरुम वरुन मिरगाव ते निंभोरे रोडने परत येत असताना, निंभोरे बाजुकडुन वेगात येणाऱ्या अनोळखी मोटार सायकल स्वाराने त्याचे ताब्यातील मोटार सायकलची जोराची धडक 4 वर्षीय बालिका अतिषा मंगेश पवार हिस देवुन तिला गंभीर जखमी केले. यामध्ये 4 वर्षीय अतिषा ही मृत पावली आहे, आतिषा जखमी झाल्यावर तिला उपचारास न नेता तसेच झालेल्या अपघाताची खबर न देता दुचाकी स्वार पळून गेला आहे असल्याची फिर्याद उमेश नरसिंग पवार यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. 

अधिक तपास पोलीस हवालदार कदम हे करीत आहेत.

No comments