Breaking News

कोरोना पार्श्वभूमीवर नाताळ साध्यापध्दतीने साजरा करावा: जिल्हाधिकारी

Christmas should be celebrated in a simple way on the background of Corona: Collector

जिल्ह्यात  कलम 144 लागू

        सातारा -: कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयात नाताळ सण हा उत्सव साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 जारी केला असून  25 डिसेंबर रोजी रोजीचे रात्री बारा वाजलेपासून  नाताळ सण उत्सव पुर्ण होईपर्यंत पुढील प्रमाणे आदेश जारी  केले आहेत. 

         खिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पध्दतीने साजरा करावा.  नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी.  चर्चमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझारचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.   नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येणूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.   चर्चमध्ये प्रभु येशू खिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा.  चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने स्टॉल लावण्यात येऊ नयेत.  60 वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची  सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.  सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे.  कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक । सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये.  फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.  31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ( Thanks Giving Mass ) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे.  कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भात रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.  

No comments