शेअर बाजारात चौथ्या दिवशीही तेजी
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 5 नोव्हेंबर) - सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची तेजी आठवडय़ाच्या चौथ्या दिवशीही कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे सलग चौथ्या दिवशीही शेअरबाजारात तेजी दिसली. सेन्सेक्स ७२४ अंकांनी वधारला असून तो ४१३७० अंकावर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २११ अंकाच्या वाढीसह १२१२० अंकावर बंद झाला.
आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मधील सर्वच ३० शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय इंडस्इंड बँक, सन फार्मा, इन्फोसिस, कोटक बँक, टेक महिंद्रा,एचडीएफसी, पॉवरग्रीड, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी आणि एल अँड टी, पीएनबी, येसबा बँक, टाटा मोटर्स या महत्वाच्य शेअरमध्ये वाढ झाली आहे.
कोरोना संकट असून देखील एसबीआय दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. एसबीआयची कामगिरी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवण्यासाठी फायदेशीर ठरल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. एसबीआयचा शेअर 5.63 टक्क्यांनी वधारला आहे.
टॉप गेनर्स शेअर (Top Gainers Share)
काही महत्वाच्या शेअर्स चे भाव आज वधारले (NSE)
- सेल 10.7 टक्के
- एचपीसीएल 9.91 टक्के
- नाल्को 7.8 टक्के
- हिंडल्को 6.15 टक्के
- एसबीआय 5.63 टक्के
- इंडस इंड बँक 5.36 टक्के
- टाटा स्टील 5.35 टक्के
- मुथूट फायनान्स 5.36 टक्के
- सन टीव्ही नेटवर्क 5.12 टक्के
टॉप लूजर्स शेअर (Top Losers Share)
काही महत्वाच्या शेअर्स चे भाव आज घसरले (NSE)
- गोदरेज प्रॉपर्टी 6.77 टक्के
- अंबुजा सिमेंट 3.27 टक्के
- गोदरेज कंजूमर 1.1टक्के
- हिरो मोटर 0.80 टक्के

No comments