फलटण शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल अशोका चा श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते शुभारंभ
![]() |
| हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा शुभरंभ करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळक समवेत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नंदकुमार भोईटे, अमित भोईटे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - नंदकुमार भोईटे यांनी सुरू केलेले हॉटेल अशोका शहराच्या वैभवात भर घालणारे असून, चौकाचे केलेलं सुशोभीकरण देखील अत्यंत चांगले आहे. हॉटेल अशोका व्हेज रेस्टॉरंट मध्ये बॅंक्वेट हॉल व डायनिंग हॉल तसेच इतर चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्यामुळे हॉटेल अशोका ग्राहकांच्या पसंतीचे हॉटेल झाल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळक यांनी काढून, हॉटेल अशोकाची जबाबदारी अमित भोईटे हे यशस्वीरित्या सांभाळतील असा विश्वास व्यक्त करीत, हॉटेल अशोका च्या टीमला शुभेच्छा दिल्या.
![]() |
| हॉटेल अशोका व स्व.अशोकराव भोईटे स्मृती चौक |
हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन व स्व.अशोकराव भोईटे स्मृती चौकाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, के बी एक्सपोर्ट चे डायरेक्टर सचिन यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंट शुभरंभ प्रसंगी, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उदघाटन झाल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिन यादव यांनी संपूर्ण हॉटेल व चौकाची पाहणी केली.
सलग ३५ वर्षे फलटण नगर परिषदेत निवडून जात असताना शहर विकासाच्या अनेक संकल्पना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असतात व आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यात आलेल्या कृष्णेच्या पाण्याने संपूर्ण तालुका १०० % बागायत होत असताना, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी, कमिन्स इंटरनॅशनल कंपनीची अनेक युनिट उभी रहात असताना झालेला औद्योगिक विकास, शिक्षण क्षेत्रात उभी राहिलेली नर्सिंग, कृषी, फलोद्यान, अभियांत्रिकी महाविद्यालये, नगर पालिका, बाजार समिती, सहकारी दूध संघ व गोविंद मिल्क प्रॉडक्टस सारख्या खाजगी संस्थांनी केलेली प्रगतीमुळे फलटणचा शहरी भाग वाढत आहे. शहरी भागातील नागरिकांसाठी हॉटेल अशोका नक्कीच पसंतीस उतरेल अशी आशा फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी व्यक्त केली.
या वेळी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय अनपट, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक अजय माळवे, अनुप शहा, सलीम शेख, राहुल निंबाळकर, यशवंत बँकेचे व्हा. चेअरमन नरेंद्र भोईटे यांच्यासह फलटण तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.


No comments